पित्याच्या मारेक-याचे १२ तुकडे करून मुलाने घेतला खुनाचा बदला

By admin | Published: December 22, 2015 01:21 PM2015-12-22T13:21:15+5:302015-12-22T13:22:57+5:30

उत्तर प्रदेशमधील एका २४ वर्षीय मुलाने आपल्या पित्याच्या मारेक-याला ठार मारून प्रत्येक वर्षासाठी एक अशा रितीने त्याच्या शरीराचे १२ तुकडे करत वडिलांच्या खुनाचा बदला घेतला

Changed the murder of the father by killing 12 pieces of his father | पित्याच्या मारेक-याचे १२ तुकडे करून मुलाने घेतला खुनाचा बदला

पित्याच्या मारेक-याचे १२ तुकडे करून मुलाने घेतला खुनाचा बदला

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - उत्तर प्रदेशमधील एका २४ वर्षीय मुलाने आपल्या पित्याच्या मारेक-याला ठार मारून प्रत्येक वर्षासाठी एक अशा रितीने त्याच्या शरीराचे १२ तुकडे करत वडिलांच्या खुनाचा 'अनोखा' बदला घेतला. आलम खान असे त्याचे नाव असून तो १२ वर्षांचा असताना त्याने त्याच्या वडिलांचा मित्र मोहम्मद रईसने वडिलांचा खून केल्याचे पाहिले होते. मात्र वडिलांच्या मारेक-याचे नाव कोणालाच न सांगता आलमने त्याचा बदला घेण्यासाठी कट रचला आणि  १२ वर्षांनी तो प्रत्यक्षात आणला.
गेल्या ठआवड्यात आलमने रईस आपल्या घरी मद्यपानासाठी निमंत्रण दिले. रईसवर मद्याचा बराच अमल चढल्याचे लक्षात आल्यानंतर आलमने चाकू भोसकून त्याचा खून केला. आणि मोठ्या आवाजात गाणी लावून त्याने रईसच्या शरीराचे १२ तुकडे केले. वडिलांच्या खुनाला १२ वर्षे उलटून गेल्यामुळे प्रत्येक वर्षासाठी एक अशा रितीने त्याने रईसचे तुकडे केले आणि एका साथीदाराच्या मदतीने ते तुकडे प्लॅस्टिक बॅग्समध्ये कोंबून ते एका नदीत टाकून दिले.
काही दिवसांनी त्या बॅग्ज नदीकिना-यावर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले असता, शरीरावरील शस्त्रक्रियांच्या खुणांमुळे पोलिसांनी तो मृतदेह रईसचा असल्याचे ओळखले. मृत्यूपूर्वी अनेकांनी रईसला शेवटचं आलमच्या घरी जाताना पाहिलं होतं, त्यावरून पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, आलमने आपला गुन्हा कबूल केला, एवढंच नव्हे तर आपला संपूर्ण प्लॅनही कथन केला. चौकशीदरम्यान त्याच्या बोलण्यातून त्याला या कृत्याचा जराही पश्चाताप झाल्याचे दिसत नव्हते, उलट आपला प्लॅन खरोखरच पूर्ण झाल्यामुळे तो आनंदी होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Changed the murder of the father by killing 12 pieces of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.