‘तलाक’ पद्धतीत बदल शक्य नाही

By admin | Published: September 3, 2015 10:08 PM2015-09-03T22:08:19+5:302015-09-03T22:08:19+5:30

एकाच प्रसंगी तीनदा ‘तलाक’ म्हटल्यावर ते ‘एकदा’ मानावे, ही मागणी धुडकावून लावत ‘तलाक’ पद्धतीत कुठलाही बदल शक्य नसल्याचे आॅल इंडिया मुस्लीम

Changes to 'divorce' method can not be changed | ‘तलाक’ पद्धतीत बदल शक्य नाही

‘तलाक’ पद्धतीत बदल शक्य नाही

Next

लखनौ : एकाच प्रसंगी तीनदा ‘तलाक’ म्हटल्यावर ते ‘एकदा’ मानावे, ही मागणी धुडकावून लावत ‘तलाक’ पद्धतीत कुठलाही बदल शक्य नसल्याचे आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. एकाच प्रसंगी तीनदा तलाक म्हणणे ‘कुराण व हदीस’नुसार गुन्हा आहे. मात्र तरीही ‘तलाक’ पद्धतीत बदल करण्याचा विचार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना अब्दुल रहीम कुरैशी यांनी ही स्पष्टोक्ती दिली. अनेकदा रागाच्या भरात एकाच प्रसंगी तीनदा तलाक म्हणतात व नंतर याचा त्यांना पश्चाताप होतो. त्यामुळे इस्लामी कायद्यात शक्य असल्यास, एकाच प्रसंगी तीनदा तलाक म्हटल्यास ते ‘एकदा’ मानले जावे, अशी मागणी सुन्नी उलेमा कौन्सिलने केली आहे.

Web Title: Changes to 'divorce' method can not be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.