चार वर्षानंतर नव्या नोटात होणार बदल?
By admin | Published: April 2, 2017 06:20 PM2017-04-02T18:20:18+5:302017-04-02T18:20:18+5:30
खोट्या नोटांवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.
चार वर्षानंतर बदलाणार 500 आणि दोन हजाराच्या नोटा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - खोट्या नोटांवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. Business-standardच्या वृत्तानुसार केंद्र सरकार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये प्रत्येक चार वर्षानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बदल करण्याच्या विचारात आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अनेक विकसित देशांमध्ये दर तीन ते चार वर्षांनी नोटांमधील सुरक्षेचे फीचर्स बदलले जातात. मात्र आपल्या देशात मोठ्या किंमतीच्या नोटांमध्ये अनेक वर्षांपासून बदलच करण्यात आले नव्हते. गुरुवारी अधिकाऱ्यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडला. या बैठकीतला गृह मंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी तसेच वित्त आणि गृह मंत्रलायातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चलनातील नव्या नोटांमध्ये अतिरिक्त सुरक्षेचे फीचर्स देण्यात आलेले नाहीत. या नोटांमधील फीचर्स हे जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांप्रमाणेच आहेत. 1000 रुपयांची नोट 2000 मध्ये आली होती. त्यानंतर या नोटेमध्ये कोणताही बदल कऱण्यात आलेला नाही. तर 1987 मध्ये आलेल्या 500 रुपयांच्या नोटेमध्ये गेल्या दहा वर्षाआधी बदल करण्यात आला होता.