रेल्वेच्या तिकीट दरातील बदल लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:08 AM2020-01-02T03:08:49+5:302020-01-02T03:09:07+5:30
लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली.
मुंबई : लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. नवे तिकीट दर प्रतिकिमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड येत होता. परिणामी, रेल्वे प्रशासनाने त्यावेळी तिकीट खिडक्यांवरून तिकिटांची विक्री केली. नवे तिकीट दर अपलोड करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. मात्र यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्यात आली. बुधवारपासून १ ते ४ पैशांची प्रतिकिमी भाडेवाढ झाली आहे. त्यानुसार मुंबईतून बाहेरगावी जाणाºया एक्स्प्रेसच्या तिकिटावर १० ते ४० रुपयांची वाढ होणार आहे. एक्स्प्रेसच्या साध्या नॉन एसी डब्याच्या तिकिटात प्रति किमी एक पैशाची वाढ झाली आहे. मेल-एक्स्प्रेस नॉन एसी डब्याची प्रति किमी २ पैशांनी, तर एसीच्या डब्याच्या तिकीट दरात ४ पैशांची वाढ झाली आहे.
सामान्य विनावातानुकूलित डब्याच्या तिकीट दरातील वाढ
सामान्य प्रथम श्रेणी - एक पैसे प्रति किमी
सामान्य द्वितीय श्रेणी -एक पैसे प्रति किमी
सामान्य स्लीपर - एक पैसे प्रति किमी
एसी क्लास प्रवास तिकीट दरातील वाढ
एसी चेअर कार - ४ पैसे
एसी ३ - टिअर / ३ ए - ४ पैसे
एसी २ - टिअर - ४ पैसे
एसी फर्स्ट क्लास/ इकॉनॉमी क्लास / एअ - ४ पैसे
(प्रति किलोमीटर)
मेल/एक्स्प्रेस विनावातानुकूलित तिकीट दरातील वाढ
प्रथम श्रेणी डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसे
द्वितीय श्रेणी डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसे
सामान्य स्लीपर डबा (मेल/एक्स्प्रेस) - दोन पैसे
(प्रति किलोमीटर)
साधा नॉन एसी क्लास - प्रति किमी १ पैसा
मेल-एक्स्प्रेस नॉन एसी क्लास - प्रति किमी २ पैसा
एसी क्लास - प्रति किमी ४ पैसा