कॅशलेस रेल्वे तिकिटांच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल
By admin | Published: June 6, 2017 10:00 AM2017-06-06T10:00:06+5:302017-06-06T11:20:39+5:30
इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे. या नव्या नियमांचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो आहे. तसंच कॅशलेश तिकीट विक्रीवर असणाऱ्या नियमांमध्येही बदल केले जाणार आहेत. रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के पैसे प्रवाशांना रिफंड केले जाणार आहेत. याआधी तात्काळ तिकीट रद्द केल्यास एकही रूपया परत दिला जात नव्हता. तसंच सेकंड एसीवर शंभर रूपये, थर्ड एसीसाठी 90 रूपये आणि स्लीपर कोचसाठी 60 रूपये कापले जाणार आहेत. तात्काळ तिकीट रद्द करताना हा नियम लागू होइल.
असे असतील नवे नियम-
- गाडीच्या नियोजित वेळेच्या 48 तासापासून ते 12 तास आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास 25 टक्के चार्ज लागतो. यामध्ये एक अट टाकण्यात आली आहे, 25 टक्के किंवा 48 तासांच्या आधीच्या चार्जपैकी जो चार्ज जास्त असेल तो लागू होणार आहे.
- ट्रेन यायचा 12 ते 4 तास आधी तिकीट रद्द करण्यावर तिकिटाच्या 50 टक्के चार्ज लावला जातो. यामध्ये एक नियम लागू करण्यात आला आहे, 50 टक्के किंवा 48 तास आधी तिकीट रद्द केल्यावर लागणाऱ्या चार्जपेक्षा जो जास्त असेल तो चार्ज लागला जाणार आहे. जर एखाद्या व्यकतीने गाडीच्या नियोजित वेळेच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास त्या व्यक्तीला तिकीटाचे पैसे परत मिळणार नाही.
- RAC तिकीट धारकांनी ट्रेन येण्याच्या तीस मिनीटं आधीपर्यंत तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज कापून पैसे परत मिळतील.
- जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि जर ट्रेन रद्द झाली तर त्यासाठी तिकीट डिपॉझिट रिसिप्ट जमा करणं गरजेचं नाही. तिकीटाचे पैसे परस्पर अकाउंटमध्ये जमा होतील. तर काउंटर तिकीटचा रिफंड तिकीट काउंटरवरच दिला जाइल.
- जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि नाव वेटिंग यादीत असल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. वेटिंगमध्ये ई-तिकीट घेऊन प्रवास केल्यास बिना-तिकीट ग्राह्य धरलं जाइल. वेटिंग ई-तिकीट परस्पर रद्द होणार आहे तसंत तिकिटाचे पैसे त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत.