उत्खननात प्रथमच सापडले ब्रॉन्झ युगातील रथ व शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:12 AM2018-06-07T05:12:06+5:302018-06-07T05:12:06+5:30

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील सुनौली गावात भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) केलेल्या उत्खननात ब्रॉन्झ युगातील (इ.स.पूर्व २००० ते १८००) रथांचे अवशेष प्रथमच सापडले आहेत.

 Chantons and weapons in the Bronze Age found for the first time in the excavation | उत्खननात प्रथमच सापडले ब्रॉन्झ युगातील रथ व शस्त्रे

उत्खननात प्रथमच सापडले ब्रॉन्झ युगातील रथ व शस्त्रे

Next

मेरठ : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील सुनौली गावात भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) केलेल्या उत्खननात ब्रॉन्झ युगातील (इ.स.पूर्व २००० ते १८००) रथांचे अवशेष प्रथमच सापडले आहेत.
‘एएसआय’ने गेल्या मार्चपासून यागावात आठ ठिकाणी उत्खनन सुरु केले होते. त्यात रथाच्या अवशेषाखेरीज आठ कबरस्ताने, तीन शवपेटिका, तलवारी, सुरे, कंगवे आणि आभूषणेही सापडली. तीन रथ एकाच ठिकाणी सापडल्याने ही कबरस्ताने शाही घराण्याची असावीत व त्या काळात येथे एखाद्या लढवय्या जमातीचे वास्तव्य असावे, असे संकेत मिळतात. या उत्खननाचे सहसंचालक एस.के. मुंजाल म्हणाले की, ब्रॉन्झ युगात मेसापोटेमिया व ग्रीस
संस्कृतीत रथांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. आता येथे त्याच काळातील रथ सापडल्याने येथील संस्कृतीही तेवढीच पुरातन असल्याचे दिसून येते.
मुंजाल यांच्या म्हणण्यानुसार येथे सापडलेले पुरातत्वीय अवशेष संशोधनास नवी दिशा देणारे आहेत. याचे कारण असे की, येथे सापडलेल्या शवपेटिकांवर तांब्याच्या पत्र्याचे मुकुटाच्या, फुलांच्या व शिंगांच्या आकाराची नक्षी बसविलेली आहे. यापूर्वी हडप्पा, मोहेन्जो दारो व धोलवारिया (गुजरात) येथील उत्खननातही शवपेटिका सापडल्या होत्या. परंतु त्यांवर तांब्याचे नक्षीकाम नव्हते. येथे अशा नक्षीकामाच्या शवपेटिका सापडणे हे शाही दफनविधीचे द्योतक आहे. अशा प्रकारचे भारतीय उपखंडात सापडलेले हे पहिलेच कबरस्तान आहे. तलवारी, जांबिया, ढाली व शिरस्त्राणे अशी युद्धात वापरली जाणारी आयुधे सापडली यावरून या भागातील लढवय्या जमातीचे वास्तव्य दिसून येते, असे मुंजाल म्हणाले. (वृत्तसंस्था)

याच गावात सध्याच्या ठिकाणापासून १२० मीटर अंतरावर सन २००५ मध्ये केलेल्या उत्तखनानतही कबरस्ताने व काही शस्त्रे सापडली होती. ते अवशेष हडप्पा संस्कतीशी मिळते जुळते होते. आता सापडलेले अवशेष वेगळ््या स्वरूपाचे आहेत.
येथे नेमकी कोणाची वस्ती होती याची निष्कर्ष काढायला वेळ लागेल, असेही मुंजाल यांचे म्हणणे होते.

Web Title:  Chantons and weapons in the Bronze Age found for the first time in the excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.