शनी पेठेत दोघं भावांवर चाकु हल्ला

By admin | Published: March 18, 2016 11:44 PM2016-03-18T23:44:53+5:302016-03-18T23:44:53+5:30

जळगाव : जुन्या वादातून खुन्नसने पाहिल्याने नितीन मनोज जावळे (वय २६) व निलेश सुरेश जावळे (वय ३०) दोन्ही रा. गुरुनानक नगर, शनी पेठ या दोन्ही चुलत भावांवर सनी पवार व कुणाल उर्फ गुड्डू धर्मराज पवार व अन्य एका जणाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मायक्का मंदिराजवळ चाकुने हल्ला केला. जखमींना जिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी सनी व गुड्ड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Chanu attack on both brothers in Shani Peth | शनी पेठेत दोघं भावांवर चाकु हल्ला

शनी पेठेत दोघं भावांवर चाकु हल्ला

Next
गाव : जुन्या वादातून खुन्नसने पाहिल्याने नितीन मनोज जावळे (वय २६) व निलेश सुरेश जावळे (वय ३०) दोन्ही रा. गुरुनानक नगर, शनी पेठ या दोन्ही चुलत भावांवर सनी पवार व कुणाल उर्फ गुड्डू धर्मराज पवार व अन्य एका जणाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मायक्का मंदिराजवळ चाकुने हल्ला केला. जखमींना जिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी सनी व गुड्ड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जावळे व पवार गटात जुना वाद आहे, त्यातूनच हा हल्ला झाला. शनी पेठेतील मायक्का मंदिराजवळ नितीन व निलेश या दोघांनी खुन्नसने पाहिले म्हणून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.या घटनेमुळे शनी पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथेही प्रचंड गर्दी जमा झाली होती. नितीन याच्या पोटावर तर निलेश याच्या हातावर वार झाले आहेत. दोघं जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी आरोपी व जखमी यांच्या घराच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला. हल्याच्या वेळी प्रारंभी तीन जणांची नावे समोर येत असली तरी यात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी रुग्णालयात जावून जखमींचा जबाब घेतला.
जावळे सोहम जोशी प्रकरणातील आरोपी
नितीन जावळे हा सोहम जोशी व हॉटेल पालखी प्रकरणात चर्चेत आला होता. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल असून अटकही करण्यात आली होती. शुक्रवारी त्याचा मित्र दिनेश पाथरीया याच्या शालकाचे भांडण सोडविण्यासाठी गेला असता तेव्हा त्याच्यावर हा हल्ला झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयात त्याच्या समर्थकाकडून देण्यात आली.

Web Title: Chanu attack on both brothers in Shani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.