लोकसभेसाठी भाजपा नियुक्त करणार १२०० फोन प्रभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:55 AM2018-08-06T03:55:06+5:302018-08-06T03:55:24+5:30

मतदार यादी पाननिहाय प्रमुखांच्या फौजेनंतर भाजप आता देशभरातील ५०० लोकसभा मतदारसंघांत फोन प्रभारी नियुक्त करणार आहे.

In charge of the BJP to 1200 in the phone | लोकसभेसाठी भाजपा नियुक्त करणार १२०० फोन प्रभारी

लोकसभेसाठी भाजपा नियुक्त करणार १२०० फोन प्रभारी

googlenewsNext

- हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : मतदार यादी पाननिहाय प्रमुखांच्या फौजेनंतर भाजप आता देशभरातील ५०० लोकसभा मतदारसंघांत फोन प्रभारी नियुक्त करणार आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी फोन प्रभारी या राजकीय अस्त्राचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनावरण केले. देशभरातील लोकसभा मतदारसंघांत एकूण किमान १२०० फोन प्रभारी असतील.
हे प्रभारी आपापल्या मतदारसंघांतील सर्व मतदारांशी मोबाईल-लँडलाईन नंबरवर, व्हॉटस्-अ‍ॅप आणि अन्य सोशल मीडियावर एसएमएसच्या माध्यमातून संपर्क राखतील. भाजपच्या यादीत मोबाईल सदस्यांची संख्या १२ कोटी आहे. या मोबाईल सदस्यांच्या संकलित माहितीचा भाजप वापर करणार आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मोबईल सदस्यांच्या संख्येनुसार मोबाईल फोन प्रभारी असतील. मतदारसंघ, जिल्हा, तालुका आणि गावनिहाय मोबाईल फोनसंदर्भातील स्वतंत्र आकडेवारी भाजपकडे आहे.
एखाद्या विशिष्ट भागातील समस्या जाणून घेऊन भाजपचे फोन प्रभारी मतदान केंद्र प्रभारींच्या समन्वयातून संदेश पाठवतील. त्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र तांत्रिक कक्षही असेल. त्यामुळे निवडणुकीत स्वतंत्र मोबाईल फोन कार्यकर्ते नियुक्त करण्याची उमेदवारांना गरज भासणार नाही. ही सुविधा पक्षातर्फे उमेदवारांना दिली जाणार असून, आर्थिक बोजा उमेदवारावर न टाकता पक्ष उचलणार आहे.
मतदान केंद्र प्रभारी आणि
मतदान केंद्रस्तरीय समितीच्या
२५ कार्यकर्त्यांशिवाय हे फोन
प्रभारी असतील. फोन प्रभारीव्यतिरिक्त स्वतंत्र सोशल मीडिया स्वयंसेवक असतील. लोकसभेच्या ३०० मतदारसंघांतून ५१ टक्के मतदान मिळविणे, हे भाजप अध्यक्षांचे
लक्ष्य असून, ही मतदान केंद्रे
निश्चित केली जात आहेत, असे भाजपच्या एका पदाधिकाºयाने सांगितले.
देशभरातील नऊ लाख मतदान केंद्रांपैकी भाजप ७ लाख ३० हजार मतदान केंद्रांवर भाजप भर देत आहे, असे अमित शहा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. केरळ, तामिळनाडूत भाजप आपली मेहनत वाया घालविणार नाही. मतदान केंद्र आणि फोन प्रभारी प्रदेशाध्यक्षांना माहिती देतील, तसेच नवी दिल्लीतील ११, अशोका रोड येथील भाजपच्या वॉर रूमशी संपर्कात असतील.

Web Title: In charge of the BJP to 1200 in the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.