कामगार आयुक्त कार्यालयात प्रभारी राज १६७ तक्रारी प्रलंबित : घरेलू व बांधकाम कामगारांची होते नोंदणी
By admin | Published: February 22, 2016 07:28 PM2016-02-22T19:28:39+5:302016-02-22T19:28:39+5:30
जळगाव : औद्योगिक वसाहतीसह घरेलू कामगार व बांधकाम कामगारांंना न्याय मिळावा यासाठी काम करणार्या साहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात प्रभारी राज आहे. मंजुर ४१ मनुष्यबळाचे काम या ठिकाणी केवळ ९ जणांवर सुरु आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊन तब्बल १६७ तक्रारी प्रलंबित आहेत.
Next
ज गाव : औद्योगिक वसाहतीसह घरेलू कामगार व बांधकाम कामगारांंना न्याय मिळावा यासाठी काम करणार्या साहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात प्रभारी राज आहे. मंजुर ४१ मनुष्यबळाचे काम या ठिकाणी केवळ ९ जणांवर सुरु आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होऊन तब्बल १६७ तक्रारी प्रलंबित आहेत.कामगार हिताच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तसेच मालक व कामगार यांच्यातील व्यवहाराची अंमलबजावणी कामगार कायद्यानुसार होत आहे किंवा नाही यावर साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण असते.मंजुर मनुष्यबळ ४१ प्रत्यक्षात ९ जणजळगाव साहाय्यक कामगार आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार हा नाशिक येथील व्ही.एन.माळी यांच्याकडे आहे. तर सरकारी कामगार अधिकारी या पदाचा पदभार धुळे येथील अनिल कुंटे यांच्याकडे आहे. या कार्यालयात तीन लिपीकांची नियुक्ती आहे. त्यात चाळीसगाव, पाचोरा कार्यालयातील दोन लिपीकांना प्रतिनियुक्तीवर जळगाव कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तर दुकान निरीक्षक, स्टेनो व एक लिपीक हे जळगाव कार्यालयात नियुक्त आहे. शासनाने या कार्यालयासाठी ४१ जणांचे मनुष्यबळ मंजुर केले आहे. मात्र प्रत्यक्षात ९ जणांवर काम सुरु आहे.साहाय्यक आयुक्त व्ही.एन.माळी यांच्याकडे ४५ प्रकरणे प्रलंबित आहेत. तर सरकारी कामगार अधिकारी कुटे यांच्याकडे १२२ तक्रारी प्रलंबित आहेत. कामगार व मालक यांच्याकडून तब्बल १०० प्रकरणांमध्ये प्रतिसाद दिला जात नसल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे.सरकारी कामगार अधिकारी कुंटे यांच्याकडे धुळे व जळगावचा पदभार आहे. त्यामुळे ते आठवड्यातून केवळ दोन दिवस जळगावात येत असतात. त्यातही एखाद्यावेळी धुळे कार्यालयातील कामाचा भार असल्यास ते आठवडाभर येत नसल्याची स्थिती आहे. अतिरिक्त पदभारामुळे कामगारांच्या तक्रारींचे तत्काळ निरसरण न होता त्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण मोठे आहे.