यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:14 AM2022-07-29T06:14:51+5:302022-07-29T06:15:31+5:30

एमडीआर शुल्क दुकाने अथवा ई-कॉमर्स साईट्सकडून वसूल केले जाते.

Charges on UPI payments? 10 percent will fall | यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार

यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  रुपे क्रेडिट कार्डावरून करण्यात येणाऱ्या यूपीआय व्यवहारांवर २ % एमडीआर लावण्यात येणार आहे. एनपीसीआय आणि बँका यांच्यात याबाबत सहमती झाली आहे.

एमडीआर शुल्क दुकाने अथवा ई-कॉमर्स साईट्सकडून वसूल केले जाते. उदा. ग्राहक एखाद्या व्यावसायिकास कार्डाद्वारे १० हजार रुपयांचे पेमेंट करीत असेल, तर व्यावसायिकास त्यावर २ टक्के म्हणजेच २०० रुपयांचा एमडीआर लागेल. 

कोणाचा किती हिस्सा?
रुपे क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारावरील २ टक्के एमडीआरमधील १.५ टक्के हिस्सा कार्ड जारी करणाऱ्या बँकेचा असेल. उरलेला अर्धा टक्का हिस्सा रुपे आणि ज्या बँकेच्या खात्यात पैसे जातील त्या बँकेचा असेल. ही योजना मंजुरीसाठी आरबीआयकडे पाठविण्यात येईल. रुपे यूपीआय क्रेडिट कार्ड व्यवहार सप्टेंबरपासून सुरू होतील. सध्या डेबिट कार्डांवरील २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर एमडीआर लागत नाही.

Web Title: Charges on UPI payments? 10 percent will fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.