राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी सिसोदियांवर आरोपपत्र
By admin | Published: December 26, 2016 12:47 AM2016-12-26T00:47:28+5:302016-12-26T00:47:28+5:30
राष्ट्रध्वजाचा २०१३मध्ये अपमान केल्याच्या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रध्वजाचा २०१३मध्ये अपमान केल्याच्या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ येथील रहिवासी प्रताप चंद्र यांनी या संदर्भात १३ आॅगस्ट २०१३ रोजी दिलेली तक्रार आणि फेसबुकवर अपलोड केलेली छायाचित्रे या आधारावर सिसोदिया यांच्यावर आरोप आहेत.
गाझियाबादेत रस्त्यावरील अपघातात ठार झालेला आम आदमी पक्षाचा (आप) कार्यकर्ता संतोष कोली याच्या मृतदेहावर सिसोदिया यांनी राष्ट्रध्वज गुंडाळल्याचा आरोप आहे. सिसोदिया त्यावेळी उपमुख्यमंत्री नव्हते. पोलिसांनी खासगी वृत्तवाहिनीशी मूळ व्हिडिओसाठी संपर्क साधल्याच्या वृत्ताला या सूत्रांनी दुजोरा दिला. आमच्याकडे पुरेसे पुरावे असून येत्या दोन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलीस अधिकारी म्हणाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)