ओबीसी विद्यार्थ्यांकडून डीयूमधील प्रवेशासाठी अधिक शुल्क आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:41 AM2020-07-03T00:41:03+5:302020-07-03T00:41:10+5:30
ऑनलाईन अर्ज; विद्यार्थी संघटनेची केंद्र सरकारकडे तक्रार
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आॅनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी ओबीसी विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारण्यात येत असून, त्याचा फटका १७ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना बसल्याची तक्रार आहे.
स्टुडंट्स राइट्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी विद्यापीठाचे कुलगुरु यांना पत्र लिहून ओबीसी विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारणी केली जात असल्याकडे लक्ष वेधले आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ खुल्या संवर्गातील आर्थिकदृप्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारत आहे तर ओबीसी नॉन क्रिमीलेयर विद्यार्थ्यांकडून २५० रुपये शुल्क आकारले जात आहे.
62 हजार जागा दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयांत रिक्त आहेत. 27 टक्के ओबीसीला अभ्यासक्रमांत आरक्षण आहे. 17 हजार ओबीसी विद्यार्थ्यांकडे डीयूकडून अन्यायकारक शुल्क आकारले जात आहे. तक्रार करूनही दखल न घेतल्याची तक्रार कोर्राम यांनी केली.