सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बदली बीड जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती
By Admin | Published: January 20, 2016 01:51 AM2016-01-20T01:51:35+5:302016-01-20T01:51:35+5:30
पुणे : विभागीय सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बीड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थाकडून संस्थेच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन नाव वापरू नये असे आदेश त्यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून मागील पंधरवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनादोलन संघटनेचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
प णे : विभागीय सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची बीड जिल्ह्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थाकडून संस्थेच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन नाव वापरू नये असे आदेश त्यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून मागील पंधरवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनादोलन संघटनेचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.डिगे यांनी २ जून २०१४ रोजी पुण्यात सह धर्मादाय आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पुणे येथील बिर्ला हॉस्पिटल, वानवडी येथील रूबी हॉल क्लिनिक यासारखी महत्वाची हॉस्पिटल त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना खुली केली. शिक्षण प्रसारक मंडळ, गुरूसिंग सभा यासारख्या महत्वाच्या संस्थांची गैरकारभारामुळे विश्वस्त मंडळे बरखास्त केली. जेजुरीच्या मंदिरामधील पुजार्यांचे अधिकार कमी करताना निम्मे उत्पन्न देवस्थानला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. विद्या प्रतिष्ठानची ७३ एकर जागा मूळ संस्थेला परत देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांनी दिला. दरम्यान, त्यांच्या सह धर्मादाय आयुक्त पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.