राज्यात आणि केंद्रात चर्मकार समाजाला स्थान नाही
By Admin | Published: December 18, 2014 10:39 PM2014-12-18T22:39:30+5:302014-12-18T22:39:30+5:30
नागपूर : राज्यात नव्या सरकारमध्ये मागासवर्गीय समाजाच्या २९ जागा राखीव आहे. यापैकी १५ जागेवर चर्मकार समाजाचे १५ आमदार निवडून आले आहे. तर लोकसभेच्या पाच राखीव जागापैकी तीन जागेवर चर्मकार समाजाचे खासदार निवडून आले आहे. असे असतानाही केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळात चर्मकार समाजाला स्थान नाही, अशी खंत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय मंत्री व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. समाजाच्या लोकप्रतिनिधीचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समाजातर्फे राज्यात निवडून आलेल्या समाजाच्या १५ आमदारांचा सत्कार २१ डिसेंबरला संत रविदास सांस्कृतिक सभागृह, हनुमाननगरात होणार असल्याचे घोलप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रवींद्र राजुस्कर
न गपूर : राज्यात नव्या सरकारमध्ये मागासवर्गीय समाजाच्या २९ जागा राखीव आहे. यापैकी १५ जागेवर चर्मकार समाजाचे १५ आमदार निवडून आले आहे. तर लोकसभेच्या पाच राखीव जागापैकी तीन जागेवर चर्मकार समाजाचे खासदार निवडून आले आहे. असे असतानाही केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळात चर्मकार समाजाला स्थान नाही, अशी खंत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय मंत्री व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. समाजाच्या लोकप्रतिनिधीचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समाजातर्फे राज्यात निवडून आलेल्या समाजाच्या १५ आमदारांचा सत्कार २१ डिसेंबरला संत रविदास सांस्कृतिक सभागृह, हनुमाननगरात होणार असल्याचे घोलप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रवींद्र राजुस्कर, ज्ञानेश्वर बसेशंकर, मीना भागवतकर, नीलकंठ चांदेकर, दामोधर चंगोले, मधुकर बर्वे, कृष्णा बोदलखंडी, दिगांबर पिंपळकर, मधु चापके उपस्थित होते.