केरळमधील आकर्षक हिल स्टेशन देविकुलम

By admin | Published: January 18, 2017 05:23 AM2017-01-18T05:23:17+5:302017-01-18T05:23:17+5:30

देविकुलम हे छोटेसे हिलस्टेशन दक्षिण केरळमध्ये मुन्नारपासून (जि. इडुक्की) पाच किलोमीटरवर (३.१ मैल) आहे.

Charming hill station of Kerala, Devikulam | केरळमधील आकर्षक हिल स्टेशन देविकुलम

केरळमधील आकर्षक हिल स्टेशन देविकुलम

Next


केरळ - देविकुलम हे छोटेसे हिलस्टेशन दक्षिण केरळमध्ये मुन्नारपासून (जि. इडुक्की) पाच किलोमीटरवर (३.१ मैल) आहे. ते समुद्र सपाटीपासून ते १,८०० मीटर्सवर (५,९०० फूट) आहे. देवतेच्या नावातील देवी आणि कुलम म्हणजे तलाव. यापासून ‘देविकुलम’ असे त्याची ओळख बनली आहे. पौराणिक कथेत सांगितल्यानुसार देवी सीतेने सुंदर अशा या सरोवरात स्नान केले. त्याच्याभोवती लुसलुशीत हिरव्यागर्द टेकड्या होत्या. आज त्याचे नाव ‘सीतादेवी सरोवर’ असे आहे.
पर्यटकांचा येथे मोठा राबता असतो, तो फक्त हे ठिकाण पवित्र व सुंदर आहे म्हणूनच नव्हे, तर त्याच्या मिनरल पाण्यात आजार बरे करण्याचे गुण आहेत म्हणूनही. येथील बहुतेक रहिवासी मल्याळम व तामिळ भाषा बोलतात. येथून जवळच पल्लीवासल धबधबे, घनदाट हिरवे चहाचे मळे, लाल, निळ््या आणि पिवळ््या रंगाच्या डिंकाच्या झाडांची नैसर्गिक वाढ तुम्हाला मोहवून टाकते. मंगलम देवी मंदिर हे १३३७ मीटर उंचीवरील टेकडीवर असून, येथे चैत्र पौर्णिमा महोत्सव प्रसिद्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावीच लागते. या खेड्यात जाण्यासाठी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर येता येते. कोट्टायम (१३० किलोमीटर) आणि कोची (१५० किलोमीटर) ही रेल्वेस्थानके जवळ असून, देविकुलमला टॅक्सी व बसने जाता येते. कोचीन (कोची) आणि कोट्टायमपासून वाहनाने जाता येते.

Web Title: Charming hill station of Kerala, Devikulam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.