पाकला धूळ चारू!
By admin | Published: September 25, 2016 06:12 AM2016-09-25T06:12:12+5:302016-09-25T06:12:12+5:30
सव्वाशे कोटी भारतीय जनतेचे मनोबल पूर्वी कधीही नव्हते, एवढे आज बुलंद आहे. उच्च मनोबल हेच भारतीय सैन्याचे सामर्थ्य आहे. याच सामर्थ्याच्या जोरावर पाकिस्तानला
मोदींचे थेट आव्हान : उरीतील बलिदान व्यर्थ जाणार नाही
कोझिकोड : सव्वाशे कोटी भारतीय जनतेचे मनोबल पूर्वी कधीही नव्हते, एवढे आज बुलंद आहे. उच्च मनोबल हेच भारतीय सैन्याचे सामर्थ्य आहे. याच सामर्थ्याच्या जोरावर पाकिस्तानला त्याने दहशवादाच्या स्वरूपात भारताविरुद्ध पुकारलल्या युद्धात धूळ चारली जाईल, अशी स्फूर्तिदायक ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिली.
भारतीय जनता पक्षाच्या येथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी पाकिस्तानवर अत्यंत सडेतोड आणि कडक भाषेत थेट हल्ला चढविला. भारताने आजवर कधीही दहशतवादापुढे मान तुकवलेली नाही व या पुढेही तो शरणागती पत्करणार नाही, असे ठामपणे सांगून, पंतप्रधान म्हणाले की, दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला जगात एकटे पाडण्याचा विडा भारताने उचलला आहे. यामुळे खुद्द पाकिस्तानची जनताच आपल्या सत्ताधाऱ्यांना हा मार्ग सोडण्यास भाग पाडेल.
काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या १८ बहाद्दर जवानांना बलिदान द्यावे लागले, यावरून देशात सध्या आक्रोशाचे वातावरण आहे, असे नमूद करून, हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, देशाला याचा कधीही विसर पडणार नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘गेल्या काही महिन्यांत काश्मीरच्या सीमेवरून सशस्त्र दहशतवाद्यांच्या तुकड्या हाहाकार माजविण्यासाठी भारतात येण्याचे प्रयत्न करीत असताना, असे तब्बल १७ प्रयत्न अहोरात्र डोळ््यात तेल घालून सज्ज असलेल्या आपल्या शूर सैनिकांनी हाणून पाडले. यात लष्कराने ११०हून अधिक घुसखोर सशस्त्र अतिरेक्यांना सीमेवरच कंठस्नान घातले. पूर्वी काही महिन्यांच्या अल्पावधीत एवढे घुसखोर अतिरेकी मारले गेले नव्हते. एकट्या उरीच्या बाबतीत हे घुसखोर यशस्वी झाले आणि दूर्दैवाने आपल्या १८ जवानांना शहीद व्हावे लागले. यावरून लष्कराने घुसखोरीचे इतर १७ प्रयत्न हाणून पाडले नसते तर केवढा मोठा अनर्थ घडला असता याची कल्पनाही करवत नाही.
भाषणाच्या सुरुवातीस पाकिस्तानचे नाव न घेता सुरुवात करून मोदी यांनी नंतर पाकिस्तानवर आणि तेथील सत्ताधाऱ्यांवर थेट तोफ डागली. ते म्हणाले की, एकेकाळी पाकिस्तानचे सत्ताधीश भारताशी हजार वर्षे लढत राहण्याची भाषा करायचे.
आज ते दहशतवाद्यांना पुढे करून (छुपे) युद्ध खेळत आहेत. पूर्वीही भारतापुढे पाकिस्तानची डाळ शिजलेली नाही व यापुढेही त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
मोदी म्हणाले की, २१ वे शतक हे आशिया खंडाचे आहे, असे जग मानते. आशिया खंडातील अतर सर्व देश हा विश्वास सार्थ करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. पण पाकिस्तान हा एकच देश विकास आणि खुशहालीचा मार्ग सोडून दहशतवाद पोसत आहे.
जगात कुठेही दहशतवादी घटना घडली की त्या हल्लेखोरांचे मूळ कुठे ना कुठे पाकिस्तानात असल्याचे दिसते किंवा ओसामा बिन लादेनसह या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचे दिसते. जगभरातील देशांनी पाकिस्तानचे खरे स्वरूप ओळखले असून हे देश दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानकडे गुन्हेगार म्हणून पाहात आहेत.
पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांशी या बाबतीत चर्चा आणि वाटाघाटी करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे, ही भावना मनात ठेवून पंतप्रधानांनी पाकिस्तानी जनतेनेच आता आपल्या सरकारला जाब विचारून वठणीवर आणावे, असे थेट भावनीक आवाहन केले. (वृत्तसंस्था)
मल्याळीमध्ये भाषांतर
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी गेल्या अडीच वर्षांत देशभरात शेकडो भाषणे केली. कोणत्याही लेखी तर्जुम्याविना ओघवत्या व जोशपूर्ण हिंदीत अस्खलित वक्तृत्व ही मोदींची खासियत आणि वेगळेपणही. पण केरळमध्ये हिंदी समजणारे हाताच्या बोटावर मोजणारे असूनही समोर बसलेल्या श्रोत्यांएवढेच देशभरातील आणि खास करून पाकिस्तानमधील श्रोते डोळ््यापुढे ठेवून मोदींनी हिंदीतच भाषण केले. पण दर चार-आठ वाक्यांनंतर त्याचे तेवढ्याच ओघवत्या व आवेशपूर्ण मल्याळीमध्ये भाषांतर केले गेल्याने मोदींना थांबून,थांबून बोलावे लागले.
आपल्या शूर सैनिकांनी हाणून पाडले. यात लष्कराने ११०हून अधिक घुसखोर सशस्त्र अतिरेक्यांना सीमेवरच कंठस्नान घातले. पूर्वी काही महिन्यांच्या अल्पावधीत एवढे घुसखोर अतिरेकी मारले गेले नव्हते. एकट्या उरीच्या बाबतीत हे घुसखोर यशस्वी झाले आणि दूर्दैवाने आपल्या १८ जवानांना शहीद व्हावे लागले. यावरून लष्कराने घुसखोरीचे इतर १७ प्रयत्न हाणून पाडले नसते तर केवढा मोठा अनर्थ घडला असता याची कल्पनाही करवत नाही.
भाषणाच्या सुरुवातीस पाकिस्तानचे नाव न घेता सुरुवात करून मोदी यांनी नंतर पाकिस्तानवर आणि तेथील सत्ताधाऱ्यांवर थेट तोफ डागली. ते म्हणाले की, एकेकाळी पाकिस्तानचे सत्ताधीश भारताशी हजार वर्षे लढत राहण्याची भाषा करायचे.
आज ते दहशतवाद्यांना पुढे करून (छुपे) युद्ध खेळत आहेत. पूर्वीही भारतापुढे पाकिस्तानची डाळ शिजलेली नाही व यापुढेही त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.
मोदी म्हणाले की, २१ वे शतक हे आशिया खंडाचे आहे, असे जग मानते. आशिया खंडातील अतर सर्व देश हा विश्वास सार्थ करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. पण पाकिस्तान हा एकच देश विकास आणि खुशहालीचा मार्ग सोडून दहशतवाद पोसत आहे.
जगात कुठेही दहशतवादी घटना घडली की त्या हल्लेखोरांचे मूळ कुठे ना कुठे पाकिस्तानात असल्याचे दिसते किंवा ओसामा बिन लादेनसह या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचे दिसते. जगभरातील देशांनी पाकिस्तानचे खरे स्वरूप ओळखले असून हे देश दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानकडे गुन्हेगार म्हणून पाहात आहेत.
पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांशी या बाबतीत चर्चा आणि वाटाघाटी करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे, ही भावना मनात ठेवून पंतप्रधानांनी पाकिस्तानी जनतेनेच आता आपल्या सरकारला जाब विचारून वठणीवर आणावे, असे थेट भावनीक आवाहन केले. (वृत्तसंस्था)
मल्याळीमध्ये भाषांतर
पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी गेल्या अडीच वर्षांत देशभरात शेकडो भाषणे केली. कोणत्याही लेखी तर्जुम्याविना ओघवत्या व जोशपूर्ण हिंदीत अस्खलित वक्तृत्व ही मोदींची खासियत आणि वेगळेपणही. पण केरळमध्ये हिंदी समजणारे हाताच्या बोटावर मोजणारे असूनही समोर बसलेल्या श्रोत्यांएवढेच देशभरातील आणि खास करून पाकिस्तानमधील श्रोते डोळ््यापुढे ठेवून मोदींनी हिंदीतच भाषण केले. पण दर चार-आठ वाक्यांनंतर त्याचे तेवढ्याच ओघवत्या व आवेशपूर्ण मल्याळीमध्ये भाषांतर केले गेल्याने मोदींना थांबून,थांबून बोलावे लागले.
भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि त्यासाठी सर्व देशवासीयांनी शांतता, एकता व सद्भावना या त्रिसूत्रीने समरसतेने झटण्याचा संकल्प सोडावा, असे आवाहन मोदींनी केले. मोदींनी ज्या भारताचे स्वप्न रंगविले, ते त्यांच्याच शब्दांत असे : गरिबी से मुक्त और समृद्धी से युक्त, भेदभाव से मुक्त और समता से युक्त, अन्याय से मुक्त और न्याय से युक्त, गंदगी से मुक्त और स्वच्छता से युक्त, भ्रष्टाचार से मुक्त और पारदर्शिता से युक्त, बेरोजगारी से मुक्त और रोजगारी से युक्त, महिला अत्याचार से मुक्त और नारीसन्मान से युक्त आणि निराशा से मुक्त और आशा से युक्त.
पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून मोदी म्हणाले की, काश्मीरचा विषय धुमसत ठेवून तुमचे सरकार तुम्हाला उल्लू बनवत आहे, हे लक्षात घ्या. एके काळी तुमच्याच देशाचा भाग असलेले पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) हे टिकवून ठेवू शकले नाहीत. दुसऱ्याचे काश्मीर गिळण्याचे ते स्वप्न पाहात आहेत, पण स्वत:च्याच देशात असलेले बलुचिस्तान, पख्तुनिस्तान हे प्रांत राखणे त्यांना कठीण जात आहे.
पाकिस्तानी जनतेला मोदींचे आवाहन
तुमचे सरकार युद्ध करायचे म्हणते, तर ते आव्हान मी स्वीकारत आहे. मात्र, हे युद्ध गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, बाल व मातामृत्यू याविरुद्ध व्हावे, यासाठी तुम्ही तुमच्या सरकारकडे आग्रह धरा. भारत व पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले, पण भारत आज जगात संगणक सॉफ्टवेअरची निर्यात करीत आहे आणि पाकिस्तान मात्र दहशतवादाची निर्यात करीत आहे, असे का? याचा तुमच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारा.
‘गरीब कल्याण वर्ष’
आजच्या भारतीय जनता पार्टीचा जन्मदाता असलेल्या पूर्वीच्या जनसंघाचे संस्थापक पं. दीनदयाळ उपाध्याय यांची यंदा जन्मशताब्दी आहे. ५० वर्षांपूर्वी याच कालिकतमध्ये झालेल्या अधिवेशनात पं. उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष झाले होते. त्यामुळेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे आणि राष्ट्रीय महासभेचे आयोजन इथे करण्यात आले होते.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे यंदाचे शताब्दी वर्ष त्यांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून, देशभर ‘गरीब कल्याण वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा मोदींनी केली.५० वर्षांपूर्वी जनसंघाने सत्तेवर येण्याचे कोणी स्वप्नही पाहले नव्हते. आज भाजपाने स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून केंद्रात सत्तेत येण्याचे स्वप्न साकार केले आहे.
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये हे स्वप्न अपूर्ण राहिले असले, तरी पक्ष आणि त्याची विचारसरणी यासाठी या राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी इतकी वर्षे ज्या खस्ता खाल्ल्या, प्रसंगी बलिदान दिले, त्याची फळे निश्चित मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.