चतु:संप्रदाय आखाड्याचे शनिवारी ध्वजारोहण
By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:00+5:302015-08-20T22:10:00+5:30
नाशिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्या हनुमानाचे निशाण असणार आहे.
Next
न शिक : साधुग्राममधील दिगंबर, निर्वाणी, निर्मोही या तिन्ही अनी आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर आता चतु:संप्रदाय खालशात शनिवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. चतु:संप्रदाय आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असणार आहे. त्यावर पर्वत घेऊन जाणार्या हनुमानाचे निशाण असणार आहे. ध्वजाची लांबी २१ फूट, तर रुंदी ८ फूट असणार आहे. लाल रंगाचा हनुमानाला शेंदूर लावला जात असल्याने ध्वजेचा रंग लाल असल्याचे सांगण्यात येत आहे. साधू- महंतांकडून होणार्या चुकांबाबतची सुनावणी याठिकाणी होऊन त्यांना दंड व शिक्षा देण्याचा अधिकार चतु:संप्रदाय खालशाला देण्यात आला आहे. सदर खालशात तिन्ही अनी आखाड्यांतून एका महंतांची नियुक्ती करण्यात येते. चारही महंतांच्या स्वाक्षरीने शिक्षा, दंड ठरविण्यात येतो. कुंभमेळा दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया या आखाड्यात पार पाडली जाते. चतु:संप्रदाय आखाड्यात तिन्ही अनी आखाड्यांतील साधू-महंतांचे वादग्रस्त प्रश्न मिटविले जातात. त्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच महंत, महामंडलेश्वर पदव्या प्रदान करण्यासाठी चतु:संप्रदाय खालशाची मंजुरी घ्यावी लागते. खालशात चतु:संप्रदाय वरिष्ठ खालसा आहे. त्यामुळे चतु:संप्रदाय खालशाच्या ध्वजारोहणानंतरच इतर खालशात ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. आखाड्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या मानपान नाट्यानंतर आता खालशाच्या ध्वजारोहणातही मानपानाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आखाड्याच्या ध्वजारोणांनतर खालशांनी ध्वजारोहणास सुरवात केली आहे. दोन दिवसांत आठ ते दहा खालशात ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे. मात्र चतु:संप्रदाय खालशाचे ध्वजारोहण महंतांच्या आगमनामुळे लांबले होते. ध्वजारोहणाला चतु:संप्रदायाचे महंत बर्फानी दादाजी, महंत फुलडोलदास बिहारी महाराज, महंत रामलखनदास महाराज, महंत रासबिहारीदास महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज उपस्थित राहणार आहेत. ( प्रतिनिधी) त्या खालशांना दंड करणार चतु:संप्रदाय खालशात ध्वजारोहण झाल्याशिवाय इतर कोणत्याही खालशात ध्वजारोहण होत नाही असा नियम आहे. मात्र याबाबत माहिती नसल्याने काही खालशांमध्ये ध्वजारोहण झाले. मात्र ज्या खालशांनी ध्वजारोहण केले. त्यांना दंड देण्यात येणार आहे. परंपरा माहिती करून न घेता खालशांनी ध्वजारोहण करणे योग्य नाही. महंत फुलडोलदास बिहारी महाराज, चतु:संप्रदाय खालसा