"आम्ही हत्या करू शकतो, पण देशाचा अपमान नाही"; शेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधान
By देवेश फडके | Published: January 29, 2021 08:56 PM2021-01-29T20:56:29+5:302021-01-29T20:59:29+5:30
आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे.
मुजफ्फरनगर : आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरीआंदोलनादरम्यान घेण्यात आलेल्या महापंचायतमध्ये ते बोलत होते.
चौधरी अजित सिंग यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, ती आमची चूक होती. आम्ही खोटे बोलत नाही, आम्ही दोषी आहोत. या कुटुंबाने नेहमी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी लढा दिला आहे. आता ही चूक पुन्हा करू नका, असे आवाहन चौधरी नरेश टिकैत यांनी यावेळी केले.
सरकारशी टक्कर घेण्याची हिंमत केवळ भारतीय किसान युनियनमध्येच आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांना गाडीवर झेंडे लावण्याचीही आता लाज वाटू लागली आहे, अशी टीका टिकैत यांनी केली. गाझीपूर येथील आंदोलन सुरू राहील. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र, ते सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले. आमचे कोणीही काहीच बिघडवू शकत नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही टिकैत म्हणाले. २६ जानेवारी रोजी काही शेतकरी संघटनांनी माघार घेतली. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना असे सोडू शकत नाही. आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महापंचायत बोलावून चूक केली, असे त्यांनी सांगितले.
आम्ही इतिहासात आमचे नाव काळ्या अक्षरात कोरू देणार नाही. शेतकरी आंदोलकांनी शिस्तीचे पालन करावे. गेल्या ३३ वर्षांपासून ही संघटना शिस्तीवरच सुरू आहे. सरकार नापास झाले आहे, असा दावा टिकैत यांनी यावेळी बोलतना केला.