दिल्लीतून झेपावणाऱ्या विमानांचा प्रवास स्वस्त
By admin | Published: July 9, 2017 12:09 AM2017-07-09T00:09:22+5:302017-07-09T00:09:22+5:30
दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या विमानातील प्रवास आता स्वस्त झाला आहे. विमानचालन नियामक मंडळाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील युजर डेव्हलपमेंट फी (यूडीएफ) कमी केली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या विमानातील प्रवास आता स्वस्त झाला आहे. विमानचालन नियामक मंडळाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील युजर डेव्हलपमेंट फी (यूडीएफ) कमी केली आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना यूडीएफचे केवळ १० रुपये द्यावे लागतील. यापूर्वी २७५ ते ५५० रुपये द्यावे लागत होते, तर आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४५ रुपये आकारण्यात येतील. यापूर्वी ही रक्कम ६३५ ते १२७० रुपये होती.
दिल्लीत उतरणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता यूडीएफ द्यावी लागणार नाही. त्यामुळे २३३ ते ४६६ व ५१८ ते १०४८ रुपयांची बचत होणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळावरील शुल्कात ४२.६ टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती, हे विशेष.
विमानतळाच्या आर्थिक नियामक प्राधिकरणाने डिसेंबर २०१५ मध्ये शुल्कात कपातीचे आदेश दिले होते; पण दिल्ली एअरपोर्ट आॅपरेटर्सने न्यायालयात धाव घेतल्याने त्याची अंमलबजावणी प्रलंबित होती.