कोरोनाच्या चाचणीसाठी स्वस्त किट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:47 AM2020-06-11T08:47:05+5:302020-06-11T08:47:24+5:30
कोरोना आहे की नाही, याचे निदान केवळ २० मिनिटांत करू शकणारे स्वस्त किट आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी तयार केले आहे. किट तयार करण्यासाठी ५५० रुपये खर्च आला असून,
Next
हैदराबाद : कोरोना आहे की नाही, याचे निदान केवळ २० मिनिटांत करू शकणारे स्वस्त किट आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी तयार केले आहे. किट तयार करण्यासाठी ५५० रुपये खर्च आला असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास ३५० इतकाच खर्च येऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या कोरोना चाचणीच्या अहवालासाठी दोन-तीन दिवस वाट बघावी लागते. नवे किट २० मिनिटांत लक्षण असलेल्या वा लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीचा रिझल्ट देऊ शकते.