अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:17+5:302015-09-04T22:45:17+5:30

Cheating with the bill of lenght loan | अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Next
>पुणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल ९० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल रघुनाथ बनसोडे (रा. संतोषनगर, कात्रज), कुंडलिक लांडगे (कात्रज) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिलींद उमर्जी (वय ४५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. उमर्जी यांचा इलेक्ट्रीकल कंत्राटदार आणि लायझनींग कन्सलटंटचा व्यवसाय आहे. बनसोडे आणि लांडगे यांची उमर्जी यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी ही ओळख वाढवत नेली. त्यांना व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी उमर्जी यांच्याकडून ९० लाख रुपयांचे कमिशन घेतले. आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून न देता फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.

Web Title: Cheating with the bill of lenght loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.