'उंगली करने का वक्त आ गया'; निवडणूक आयोगाची 'क्रिएटिव्हिटी' जोरात, पण 'उंगली'मुळे वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:19 PM2018-10-24T19:19:01+5:302018-10-24T19:20:49+5:30
तेलंगणामध्ये 7 डिसेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर निवडणूक आयोगाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.
हैदराबाद - तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभा बरखास्त केल्यामुळे राज्यातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये मतदान जागृतीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबाद शहरात मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकावरील द्विअर्थी घोषवाक्यामुळे हे फलक वादात अडकले आहेत. 'उंगली करने का वक्त आग गया' वोट करो, असा संदेश या बोर्डवर लिहिण्यात आला आहे.
तेलंगणामध्ये 7 डिसेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर निवडणूक आयोगाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी हैदराबाद शहरात काही फलक झळकावण्यात आले आहेत. या फलकावरील संदेश वादग्रस्त ठरत आहे. कारण, 'उंगली करने का वक्त आ गया हैदराबाद' वोट करो' असा संदेश या बोर्डवर लिहिला आहे. तसेच या संदेशाच्या बाजूला मतदान केल्यानंतरच्या निशाणीचे शाई लावलेले बोट दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंजारा हिल्स परिसरातील जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाजवळच हे फलक झळकले आहेत. येथील बेगमपेट आणि बंजारा हिल्स परिसरातील बस थांब्यांवर हे बोर्ड आहेत.
विशेष म्हणजे, तेलंगणा भेटीदरम्यान बंजार हिल्स परिसरातील एका हॉटेलमध्ये केंद्रीय निवडणूक पथक आणि मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत थांबले होते. त्या, हॉटेलच्या समोरील बाजूलाच हे फलक झळकले आहेत. मात्र, या फलकावरील संदेशामुळे हे फलक आणि निवडणूक आयोग वादात सापडण्याची शक्यता आहे.