तब्बल ७४ वर्षांनंतर 'तो' पुन्हा भारतात परतणार; १९४७ मध्ये झाली होती शेवटची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:37 AM2021-05-21T09:37:01+5:302021-05-21T09:37:55+5:30

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

The cheetah is set to return to India after seven decades | तब्बल ७४ वर्षांनंतर 'तो' पुन्हा भारतात परतणार; १९४७ मध्ये झाली होती शेवटची शिकार

तब्बल ७४ वर्षांनंतर 'तो' पुन्हा भारतात परतणार; १९४७ मध्ये झाली होती शेवटची शिकार

Next

संजय रानडे

नागपूर : जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी सार्थ ओळख मिरवणारा चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारत सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण आफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ॲथॉरिटी) ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. 

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत. 

१९४७ मध्ये झाली अखेरची शिकार
एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात आशियाई चित्त्यांचे प्रमाण लक्षणीय होते. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार करण्यात आली होती.

असा असतो चित्ता
मूलतः आफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी. 
प्रौढ चित्त्याचे वजन २० ते ६५ किलो. डोके लहान व गोलाकार. चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे. 
चित्त्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असल्यामुळे तो वेगाने धावतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.

Web Title: The cheetah is set to return to India after seven decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.