'शिवाजीः द बॉस'... लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी 'त्यानं' धावत्या ट्रेनमधून घेतली उडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 04:24 PM2018-04-25T16:24:32+5:302018-04-25T16:24:32+5:30

वरिष्ठांनी ५ हजार रुपयांचं बक्षीस देऊन त्याचा गौरव केला.

Chennai cop jumps out of moving train to prevents rape bid on woman | 'शिवाजीः द बॉस'... लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी 'त्यानं' धावत्या ट्रेनमधून घेतली उडी!

'शिवाजीः द बॉस'... लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी 'त्यानं' धावत्या ट्रेनमधून घेतली उडी!

Next

चेन्नईः एखाद्या व्यक्तीचा जीव जात असतानाही लोक सेल्फी काढत बसल्याचे प्रकार हल्ली घडतात. माणुसकी हरवत चालल्याचं हे दुर्दैवी चित्र अस्वस्थ करून जातं. पण, रेल्वे सुरक्षा बलातील एका संवेदशनील कॉन्स्टेबलनं, २५ वर्षीय महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी घेतल्याची घटना चेन्नईत घडली आहे. के शिवाजी असं त्याचं नाव असून त्यानं केलेला पराक्रम नावाला शोभणारा - शिवाजीसारखाच असल्याचं कौतुक सोशल मीडियावर होतंय.

के शिवाजी एका उपनिरीक्षकासोबत सोमवारी रात्री पेट्रोलिंगवर होते. एमआरटीएस ट्रेनमधून वेलाचेरी ते चेन्नई बीच असा प्रवास करत असताना, त्यांना महिलेचा आरडाओरडा ऐकू आला. महिलांच्या डब्यात काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण, ट्रेननं नुकतंच स्टेशन सोडलं होतं. डबे एकमेकांना जोडलेले नसल्यानं त्या डब्यात तात्काळ पोहोचणं शक्य नव्हतं. शिवाजी अस्वस्थ झाले होते. पुढच्या पार्क टाउन स्टेशनवर गाडी थांबायच्या आधीच त्यांनी प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि महिला डब्याकडे धाव घेतली. महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दूर ढकललं आणि महिलेची सुटका केली. त्यानंतर, रेल्वे पोलिसांनी २६ वर्षीय एस सत्यराजला अटक केली. आता त्याची रवानगी कोठडीत करण्यात आलीय. 

दरम्यान, या धक्क्यानं हादरलेली महिला सुटकेनंतर बेशुद्धच पडली. तिच्या ओठांतून रक्त येत होतं आणि कपडेही फाटले होते. शिवाजी आणि अन्य पोलिसांनी तिला तातडीने राजीव गांधी सरकारी रुग्णालयात नेलं. तिथे उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर आहे. जीआरपी प्रमुख पॉन मॅनिकाव्हेल यांनी पीडित महिलेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तेव्हा, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याबद्दल तिनं शिवाजी यांचे आभार मानले. शिवाजी यांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. वरिष्ठांनी ५ हजार रुपयांचं बक्षीस देऊन त्याचा गौरव केला.
 

Web Title: Chennai cop jumps out of moving train to prevents rape bid on woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.