चेन्नई दुर्घटनेतील बळींची संख्या ६०

By Admin | Published: July 4, 2014 05:43 AM2014-07-04T05:43:50+5:302014-07-04T05:43:50+5:30

येथील पोरुर या उपनगरातील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता ६० वर पोहोचली

Chennai counts 60 | चेन्नई दुर्घटनेतील बळींची संख्या ६०

चेन्नई दुर्घटनेतील बळींची संख्या ६०

googlenewsNext

चेन्नई : येथील पोरुर या उपनगरातील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता ६० वर पोहोचली असून, या अपघातामागील कारणांचा तपास करण्यासाठी तामिळनाडू सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली.
मुख्यमंत्री जयललिता यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. रघुपती यांच्या अध्यक्षेखाली एक सदस्यीय आयोग स्थापन केला असून, या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. हा आयोग या दुर्घटनेमागील कारणांचा तपास करणार असून, त्यासाठी जबाबदार व्यक्तींचाही शोध घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Chennai counts 60

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.