७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 09:13 AM2024-10-12T09:13:40+5:302024-10-12T09:19:52+5:30

म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली.

chennai how mysore darbhanga express collide with goods train | ७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?

७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?

म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. शुक्रवारी सायंकाळी कवरपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ ही भयंकर घटना घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर, अडकलेल्या प्रवाशांना बसने पोनेरी येथे नेण्यात आले आणि नंतर दोन ईएमयू विशेष गाड्यांद्वारे चेन्नई सेंट्रलला नेण्यात आले. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये शुक्रवारी ताशी ७५ किलोमीटर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मेन लाईवर जाण्याऐवजी लूप लाईनमध्ये घुसली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका डब्याला आग लागली आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच ते बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. 

रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे की, चेन्नई रेल्वे विभागातील पोन्नेरी-कवरपेट्टई सेक्शनमध्ये मालगाडीच्या धडकेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी पॅसेंजर ट्रेन उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्यानंतर लगेचच एक व्हिडीओ संदेश जारी केला आणि ते म्हणाले, आम्हाला कवरपेट्टई स्थानकावर बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाल्याची माहिती मिळाली. चेन्नई विभागाचं बचाव पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचलं.

११ ऑक्टोबर रोजी २०.२७ वाजता तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोन्नेरी स्टेशन नंतर एलएचबी कोच असलेली ट्रेन १२५७८ म्हैसूर दिब्रुगड दरबाबगाह एक्स्प्रेस या गाडीला पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. रेल्वेच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, कवराईपेट्टई स्थानकात प्रवेश करताना, ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाईनमध्ये जाण्याऐवजी, ट्रेन ७५ किमी प्रतितास वेगाने लूप लाईनमध्ये गेली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली." या अपघातानंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. 

Web Title: chennai how mysore darbhanga express collide with goods train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.