चेन्नई सुपर किंग्जला IPL मधून बाद करायला हवे - सुप्रीम कोर्ट
By admin | Published: November 27, 2014 12:41 PM2014-11-27T12:41:39+5:302014-11-27T12:53:58+5:30
गुरुनाथ मयप्पन हा बेटिंगमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने चेन्नई सुपर किंग्जची आता कोणतीही चौकशी न करता त्यांना आयपीएलमधून अपात्र ठरवायला हवे असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना गुरुवारी जोरदार दणका दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अधिकारी गुरुनाथ मयप्पन हा बेटिंगमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने चेन्नई सुपर किंग्जची आता कोणतीही चौकशी न करता त्यांना आयपीएलमधून अपात्र ठरवायला हवे असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.
आयपीएल फिक्सिंग प्रकरणात गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले. आयपीएलमधील नियमानुसार संघमालक कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेला आढळल्यास त्या संघाला अपात्र ठरवता येते. सुप्रीम कोर्टाने याच नियमावर बोट ठेवत चेन्नई सुपर किंग्जला अपात्र ठरवालया हवे असे सांगितले. 'एवढा गोंधळ सुरु असतानाही तुम्ही सीएसकेला अपात्र का ठरवले नाही असा सवालही सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला विचारला. बीसीसीआयमध्ये पुन्हा निवडणुका होणे गरजेेचे आहे, मात्र फिक्सिंग प्रकरणात ज्या मंडळींची नावे गुंतली आहेत, त्यांनी या निवडणुकांपासून लांब राहावे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाच्या या आदेशामुळे श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे.