वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली छत्रपती संस्था गणपती: नगरसेवक नागेश ताकमोगे यांचा आरोप
By admin | Published: September 16, 2015 11:38 PM2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30
सोलापूर : आसरा चौकात गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करीत आह़े यंदा वाहतूक सिग्नल दिसत नसल्याचे कारण पुढे करीत वाहतूक शाखेने वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली आह़े मंडपाची उभारणी न थांबवता गणेशोत्सव साजरा करू देण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी केली आह़े
Next
स लापूर : आसरा चौकात गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करीत आह़े यंदा वाहतूक सिग्नल दिसत नसल्याचे कारण पुढे करीत वाहतूक शाखेने वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली आह़े मंडपाची उभारणी न थांबवता गणेशोत्सव साजरा करू देण्याची मागणी संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी केली आह़े बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ताकमोगे यांनी रस्त्याचे अंतर, मंडळाच्या मंडपाची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला़ गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय संस्था कोणाकडूनही एक रुपया न घेता गणेशोत्सव साजरा करीत आह़े वीज मंडळाकडून कायदेशीररित्या तात्पुरते मीटर घेऊन वीज वापरली जात़े मंडप पूर्णत: खासगी जागेत आह़े यावेळी मंडळ अक्षरधामाचा 60 फुटी डेकोरेशन उभारत असून मंडपाचा काही भाग हा सिग्नलच्या समोर येतो़ तसेच हे सिग्नल अनेक दिवसांपासून बंद होत़े मनपाकडे पाठपुरावा केला तरी सिग्नल चालू होत नव्हत़े सिग्नल चालू करण्यात अडचणी असतील तर ते काढून ठेवण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केल़े मात्र मंगळवारी तत्परतेने हे सिग्नल चालू केल़े वाहतुकीला दिशा दिसत नसल्याचे कारण पुढे करुन काढलेले सिग्नल पुन्हा लावण्यात आले. पोलिसांनीच स्वत: मंडपाचा काही भाग खाली उतरवला़ पोलिसांनी स्वत: मंडप उतरवण्याची पहिलीच वेळ आह़े मागील वैयक्तिक भांडणाचा राग मनात धरून मंडप थांबवण्यात आल्याचे ताकमोगे म्हणाल़े मंडळाने गेल्याच वर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची तार भूमिगत कार्यान्वित करवून घेतली आह़े यंदा मंडपाचा उतरवलेला भाग ठेवण्यास मदत करून सहकार्य करावे, असेही ते म्हणाल़े या पत्रकार परिषदेस मंडळाचे अध्यक्ष आनंद ताकमोगे, शाम कदम, सचिन चौधरी, राजू नडगिरी, खजिनदार विशाल ताकमोगे, अविनाश फडतरे, नुरुद्दीन मुल्ला, राहुल जाधव आदी उपस्थित होत़े कोट --सिग्नल हे लाखो लोकांच्या जीवाचे संरक्षण करत़े सिग्नल झाकेल असे डेकोरेशन करणे उचित नाही़ नगरसेवक ताकमोगे हे सुशिक्षित आणि समजूतदार आहेत, ते ही बाब समजून घेतील़ ते वाद वाढवणार नाहीत़ -रवींद्र सेनगावकर पोलीस आयुक्त, सोलापूर -------------------