योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 11:21 PM2020-09-14T23:21:23+5:302020-09-14T23:26:13+5:30

हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे योगी म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा 150 कोटी रुपयांचा प्रॉजेक्ट आहे.

UP chhatrapati shivaji maharaj museum will be name of mughal museum in agra | योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

Next
ठळक मुद्देहे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल.हा प्रॉजेक्ट 150 कोटी रुपयांचा आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.

लखनौ -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा 150 कोटी रुपयांचा प्रॉजेक्ट आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. या ट्विटमध्ये योगींनी म्हटले आहे, "आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिन्द, जय भारत.

यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने, राज्यातील 11 हुतात्म्यांच्या नावाने त्यांच्या जिल्ह्यातील एक-एक रस्त्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिसूचनादेखील काढली आहे. या विभागाकडून जय हिंद वीर पथ योजनेची घोषणाही करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या रस्त्यांवर हुतात्म्यांच्या सन्मानार्थ मोठ-मोठे आकर्षक बोर्ड लावण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.

या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि दस्तऐवजदेखील असतील. यापूर्वी लखनौचे मुख्य पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांनी पर्यटन अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संग्रहालयत गॅलरी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. या गॅलरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या -

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री 

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

Web Title: UP chhatrapati shivaji maharaj museum will be name of mughal museum in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.