छत्रपती संभाजीराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर : जागृती बैठक

By admin | Published: February 2, 2015 11:52 PM2015-02-02T23:52:57+5:302015-02-02T23:52:57+5:30

लोणी कंद : छत्रपती संभाजीराजांचा इतिहास, कर्तृत्व समाजापर्यंत पोचावे म्हणून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले.

Chhatrapati ShivajiRaj's Palqi Soula Shrikhetra Tulapur: Awareness meeting | छत्रपती संभाजीराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर : जागृती बैठक

छत्रपती संभाजीराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र तुळापूर : जागृती बैठक

Next
णी कंद : छत्रपती संभाजीराजांचा इतिहास, कर्तृत्व समाजापर्यंत पोचावे म्हणून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले.
छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याचे आयोजन १८ ते २० मार्च रोजी केले आहे. यासाठी श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे जागृती बैठकीमध्ये ते बोलत होते.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शांताराम कटके, रवींद्र कंद, विपुल शितोळे, सचिन पलांडे, आत्माराम वाळके, रामदास हरगुडे, ज्ञानेश्वर शिवले, रवींद्र वाळके, अमोल शिवले, पंडित शिवले, संजय चव्हाण, राजेंद्र सातव, नीलेश वाळके, सचिन शिवले, संतोष शिवले, शिवाजी शिवले, लक्ष्मण शिवले, गणेश पुजारी, अनिल भंडारे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पालखी वढू तुळापूर अशी असेल. आकर्षक असा रथ बनविला असून पाच लाख रूपये खर्च आला आहे. १८ मार्चला पुरंदर गडावरून मार्गस्थ होईल. दुपारी १२ वा. सासवड येथे विश्रांती, रात्री वडकी येथे मुक्काम, तर २० मार्चला श्रीक्षेत्र तुळापूर येथे पोहोचेल. या वेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून, संभाजीमहाराज यांच्या इतिहासाविषयी जागृती करणारा व अविस्मरणीय सोहळा असेल. यासाठी जिल्‘ातील नागरिकांचा विशेष सहभाग व तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोहळ्यासाठी विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
फोटो ओळ : तुळापूर (ता. हवेली) येथे पालखी सोहळा तयारी बैठकीमध्ये संदीपअप्पा भोंडवे यांनी मार्गदर्शन केले. छाया : के. डी. गव्हाणे.

Web Title: Chhatrapati ShivajiRaj's Palqi Soula Shrikhetra Tulapur: Awareness meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.