लज्जास्पद! पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह देण्यासाठी मागितले 2 हजार, जमा करून पैसे दिले पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:47 PM2024-01-19T12:47:37+5:302024-01-19T12:54:50+5:30

पैसे घेऊनही रुग्णालयाने रात्री उशिरापर्यंत मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केली.

chhattisgarh 2000 rs demand for giving body after post mortem in raigarh district hospital | लज्जास्पद! पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह देण्यासाठी मागितले 2 हजार, जमा करून पैसे दिले पण...

लज्जास्पद! पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह देण्यासाठी मागितले 2 हजार, जमा करून पैसे दिले पण...

छत्तीसगडमधील एका जिल्हा रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी पैशांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (17 जानेवारी) शवविच्छेदनासाठी सुमारे दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं, त्यानंतर गावकऱ्यांनी एक हजार रुपये दिले, मात्र रुग्णालयातील लोकांनी ते मान्य केलं नाही आणि त्यांच्याकडून 1600 रुपये घेतले. 

पैसे घेऊनही रुग्णालयाने रात्री उशिरापर्यंत मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार, घरघोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी 50 वर्षीय धनमती राठिया यांचा मंगळवारी रात्री विषप्राशन केल्याने मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय चौकी पोलिसांनी कागदोपत्री कार्यवाही करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. 

कुटुंबीय सकाळपासून शवविच्छेदनाची वाट पाहत होते. तेव्हा त्यांनी रुग्णालयात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. अशा स्थितीत कुटुंबीय व ग्रामस्थांनी पैसे नसल्याचे सांगून एक हजार रुपये दिले, त्यानंतर 1600 रुपये घेतल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या पीडित कुटुंबीयांनी याबाबत तक्रार दाखल केली.

शवविच्छेदनास विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा रुग्णालयातून रोज येत असतात. शहरातील सर्व हॉस्पिटलमधून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. मृतदेहांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर चौकी पोलिसांना कागदोपत्री कार्यवाही करण्यास उशीर झाल्यास शवविच्छेदनास विलंब होतो. येथे काही ठिकाणी कर्मचारीच उशीर करतात, त्यामुळे वादाची परिस्थिती निर्माण होते. याच दरम्यान सीएमएचओ डॉ.आर.एन. मांडवी म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांकडून पैसे घेतले जात नाहीत. अशी तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.

Web Title: chhattisgarh 2000 rs demand for giving body after post mortem in raigarh district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.