छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षली हल्ला; एक जवान शहीद, 3 नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:52 PM2018-11-08T13:52:29+5:302018-11-08T15:03:09+5:30
दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयईडी स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सीआयएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.
छत्तीसगड - दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयईडी स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोटाद्वारे सीआयएसएफच्या बसला उडवलं. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. तसेच अन्य तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Visuals from Chhattisgarh: 3 civilians and 1 CISF personnel died in the incident where naxals triggered a blast on a bus near Bacheli in Dantewada. Visuals from the hospital. pic.twitter.com/lRMjW26aSw
— ANI (@ANI) November 8, 2018
दंतेवाड्यातील बचेली येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी (8 नोव्हेंबर) सकाळी सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात एका जवान शहीद झाला असून तीन नागरिकांचाही झाला आहे. या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
#UPDATE 4 casualties in the incident where naxals triggered a blast on a bus near Bacheli in Chhattisgarh's Dantewada. 3 civilians and 1 CISF personnel have lost their lives. pic.twitter.com/nN21686y7o
— ANI (@ANI) November 8, 2018
दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी याआधीही हल्ला केला होता. 30 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.
Naxals trigger a blast on a bus near Bacheli in Chhattisgarh's Dantewada. Multiple casualties. Two injured CISF personnel have been shifted to hospital. More details awaited. pic.twitter.com/NVxXSM8ONw
— ANI (@ANI) November 8, 2018