छत्तीसगडमध्ये चकमक; आठ नक्षलवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 09:56 AM2018-11-30T09:56:02+5:302018-11-30T09:59:36+5:30
पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे. तसेच, आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे. तसेच, आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, दंतेवाडामधील किरंदुल पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या हिरोली डोकापारामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. मात्र, पोलिसांना नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत कॅम्प उद्ध्वस्त केले आणि नक्षलवाद्यांना अटक केली. डीआरजी, सीआरपीएफ आणि किरंदुल पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे.
Abhishek Pallav, SP Dantewada: Police busted a Naxal camp and arrested eight Naxals following an exchange of fire between police and Naxals in Hiroli. (29.11)#Chhattisgarhpic.twitter.com/URNohXjacw
— ANI (@ANI) November 29, 2018
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. मात्र, या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.