Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 09:11 PM2018-12-11T21:11:36+5:302018-12-11T21:13:11+5:30
छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. छत्तीसगडच्या 90 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी स्वीकारली आहे. छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
Chhattisgarh Chief Minister Raman Singh resigned today after the BJP faced drubbing in the Assembly elections, for which he took "moral responsibility."
— ANI Digital (@ani_digital) December 11, 2018
Read @ANI story | https://t.co/zIigJkLJV2pic.twitter.com/cfpYjAW50g
आम्ही सलग तीनवेळा सत्तेत राहिलो. जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. काँग्रेसने जनेतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असे सिंह यांनी म्हटले आहे. याचबरोबर, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला असल्याचेही यावेळी रमण सिंह यांनी सांगितले.
Raman Singh, outgoing CM of #Chhattisgarh: I take the responsibility for this defeat because the poll was contested under my leadership. We will act as a strong Opposition and work for the development of the state. https://t.co/THZtKnKMhI
— ANI (@ANI) December 11, 2018