Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये पिछाडीवर पडलेले रमण सिंह पुन्हा 3700 मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 09:53 AM2018-12-11T09:53:20+5:302018-12-11T10:08:38+5:30
रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता.
रायपूर- छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपाच्या रमण सिंह यांचं सरकार आहे. रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जनमानसांत त्यांची चावलवालेबाबा अशीही प्रतिमा तयार झाली होती. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये आदिवासींसाठी अनेक योजना पोहोचवल्या होत्या. परंतु त्याचा भाजपाला फारसा फायदा झालेला दिसत नाही.
एकीकडे अजित जोगींनी काँग्रेसची साथ सोडून मांडलेली वेगळी चूल आणि मायावतींशी केलेली आघाडी यामुळे काँग्रेसच्या मतांचं धुव्रीकरण होण्याची शक्यता होती. पण अजित जोगी जाऊनही याचा काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगाव या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शुक्ला हे कडवी झुंज देत आहेत. तर काँग्रेसच्या करुणा शुक्लांनी चांगली आघाडी मिळवली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
Chhattisgarh Assembly Election Results Live: छत्तीसगडमध्ये काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, तर भाजपा 20 जागांवर पुढे https://t.co/ud1gJsGz1B#chhattisgarh#electionresult
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 11, 2018
Chhattisgarh Assembly Election Results Live: छत्तीसगडमध्ये भाजपा 10 जागांवर आघाडीवर https://t.co/ud1gJsGz1B #/chhattisgarh #electionresult
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 11, 2018