Chhattisgarh Assembly Elections : पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:45 PM2018-11-12T18:45:28+5:302018-11-12T18:46:16+5:30
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली.
रायपूर : छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपली असून एकूण 70 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तर छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
Voting has ended, turnout is 70% till now in the first phase of #ChhattisgarhElections2018. Figures will be updated later: Umesh Sinha, Election Commission pic.twitter.com/I26aNS7qB7
— ANI (@ANI) November 12, 2018
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी 12 गावांतील नागरिकांना घरातच कोंडून ठेवले होते. यामुळे या गावांमध्ये मतदान होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी झोपड्या, तंबू उभारून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. तसेच एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी स्फोटही घडवून आणला.
Only one percent of EVM and 1.9 percent VVPATs were changed: Sudeep Jain, Election Commission. #ChhattisgarhElections2018pic.twitter.com/igksFWgOWx
— ANI (@ANI) November 12, 2018
मतदान प्रक्रियेदरम्यान केवळ 1 टक्के ईव्हीएम मशिन आणि 1.9 टक्के व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्याने बदलण्यात आल्या.