chhattisgarh assembly election 2018 Live- दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 10:18 AM2018-11-20T10:18:22+5:302018-11-21T13:24:09+5:30

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 ...

chhattisgarh assembly election 2018 Live- दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान | chhattisgarh assembly election 2018 Live- दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान

chhattisgarh assembly election 2018 Live- दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान

Next

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण 1079 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणातून आपलं नशीब आजमावत आहेत. भाजपाकडून 9 मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या 3 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 18 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी 76.28 टक्के मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान होत असून, 11 डिसेंबर रोजी याचा निकाल लागणार आहे.

04:35 PM

दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 58.47 टक्के मतदान



 

03:31 PM

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी दुपारी 2:55 वाजेपर्यंत 45.2 टक्के मतदान



 

02:56 PM

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बजावला मतदानाचा अधिकार



 

02:49 PM

काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची घेतली भेट



 

10:52 AM

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 10 वाजेपर्यंत 12.54 टक्के मतदान



 

10:50 AM

जनता काँग्रेस छत्तीसगडचे अध्यक्ष अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी बजावला मतदानाचा अधिकार



 

10:23 AM

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, अंबिकापूरमध्ये मतदानासाठी लागल्या रांगा



 

10:22 AM

छत्तीसगडमध्ये 19 जिल्ह्यांतील 72 जागांवरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, बिलासपूर इथे मतदानाचा उत्साह



 

Web Title: chhattisgarh assembly election 2018 Live- दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.