छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून गोंधळ, पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 10:32 AM2018-11-02T10:32:30+5:302018-11-02T10:32:53+5:30
पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय.
रायपूर- पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय. छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या कार्यालयात गोंधळ झाला आहे. रायपूर दक्षिण जागेवरच्या उमेदवारासाठी काँग्रेस समर्थकांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी खुर्च्यांनाही तोडून टाकल्यात. रायपूर दक्षिणमधून कन्हैय्या अग्रवाल यांना काँग्रेसनं तिकीट दिल्यानं कार्यकर्त्ये नाराज आहेत.
रायपूरच नव्हे, तर बिलासपूरमधल्या तिकीट वाटपावरूनही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. या जागेवरून भाजपाचे बृजमोहन अग्रवाल विजयी होत आले आहेत. त्यामुळेच काँग्रेसनं जातीय समीकरण जोडून कन्हैय्या अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उद्रेकानंतर पक्षाचे नेते आर. तिवारीही यांनीही कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समोर आल्या आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यांना समजावण्यात येणार आहे. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Chhattisgarh: Ruckus was created at Congress office in Bilaspur y'day over distribution of tickets. Party leader Narendra Bolar says "Workers think that those continuously working for party should be given tickets. No one is a rebel here, we're a family.We are united against BJP" pic.twitter.com/KHLbTfHKDh
— ANI (@ANI) November 2, 2018