नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून आमदार भीमा मंडवींच्या पत्नीसह कुटुंबीयांनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 01:51 PM2019-04-12T13:51:24+5:302019-04-12T13:54:26+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती.
रायपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पूर्ण झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती. तसेच मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी ग्रामस्थांना दिली होती. मात्र आमदार भीमा मंडवींच्या कुटुंबीयांनी घरावर दु:खाचे सावट असतानाही नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला.
छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दांतेवाडामधील श्यामगिरी येथे नक्षलवाद्यांनी मंगळवारी आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात आमदार भीमा मंडवी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. भीमा मंडवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
Chhattisgarh: Family members of BJP MLA Bheema Mandvi after casting their vote in Dantewada, earlier today. Bheema Mandvi had lost his life in a naxal attack in Dantewada on 9th April. #IndiaElections2019pic.twitter.com/fvD7xsfBD1
— ANI (@ANI) April 11, 2019
दरम्यान, गुरुवारी आमदार मंडवी यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले. त्यानंतर भीमा मंडवी यांच्या कुटुंबीयांनी गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भीमा मंडवींचे वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीयांनीही मतदान केले. दरम्यान, या मतदान केंद्रावर मंडवी यांचे कुटुंबीयच नव्हे तर अन्य ग्रामस्थांनीही नक्षलवाद्यांच्या धमकीला झुगारून देत मतदानाचा हक्क बजावला.