छत्तीसगडमध्ये सरकार खरेदी करणार गायीचे शेण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:00 AM2020-07-06T03:00:07+5:302020-07-06T03:00:40+5:30
राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे.
रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडसरकार गोधन पाळणाऱ्यांकडून दीड रुपया किलो याप्रमाणे गायीचे शेण खरेदी करणार आहे. २० जुलैपासून राज्यात ‘गौधन न्याय योजना’ सुरू होत असून, त्याच सुमारास हरेली महोत्सवही सुरू होत आहे, असे अधिकाºयाने रविवारी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री रवींद्र चौबे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शनिवारी गायीचे शेणखत विकत घेण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी २५ जून रोजी ही योजना जाहीर केली होती. ते म्हणाले होते की, ‘‘गांडूळखत जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी शेणखत वापरले जाईल.’’
चौबे म्हणाले, राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे.’’
मुख्य सचिवांची समिती
शेणखत मिळवणे, निधीचे व्यवस्थापन आणि गांडूळ खताच्या उत्पादनासाठी मुख्य सचिव के.पी. मंडल यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीत चौबे म्हणाले, शेणखत गावठाण समित्या आणि महिलांचे स्वयंसहायता गट घरोघर जाऊन गोळा करतील आणि त्या खरेदीची नोंद स्वतंत्र कार्डवर ठेवतील.
च्नगर प्रशासन विभाग आणि वन समित्या आपापल्या भागांत या योजनेची देखरेख करतील.