मोठी दुर्घटना, कारखान्याची चिमणी कोसळून 30 जण गाडले गेले; अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:36 IST2025-01-09T18:36:06+5:302025-01-09T18:36:13+5:30

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Chhattisgarh; Horrific accident, plant chimney collapses, 30 people buried | मोठी दुर्घटना, कारखान्याची चिमणी कोसळून 30 जण गाडले गेले; अनेकांचा मृत्यू

मोठी दुर्घटना, कारखान्याची चिमणी कोसळून 30 जण गाडले गेले; अनेकांचा मृत्यू

Accident : छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात आज(दि.9) एक मोठी दुर्घटना घडली आहे. सायंकाळी सरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंड बनवणाऱ्या कुसुम प्लांटमध्ये चिमणी कोसळली, ज्याखाली 25-30 जण अडकले. यातील 5-8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर तात्काळ अडकलेल्या लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेली जिल्ह्यातील बिलासपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामबोड गावात असलेल्या कुसुम प्लांटमध्ये हा अपघात झाला. प्लांटमधील एक चिमणी अचानक कोसळली, ज्यामुळए तिथे काम करणारे कर्मचारी त्याखाली अडकले. ढिगाऱ्याखाली सूमारे 30 मजूर गाडले गेल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर प्लांटमध्ये आरडाओरडा सुरू झालाला. अपघाताची माहिती तातडीने पोलिस व प्रशासनाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सरगाव पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे बचाव पथक ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढत आहे. या घटनेत 5 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

 

Web Title: Chhattisgarh; Horrific accident, plant chimney collapses, 30 people buried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.