खुलासा! घरी परतला सैनिक तेव्हा पत्नी होती गर्भवती, रागाच्या भरात असं संपवलं दोघांचं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 02:49 PM2017-08-22T14:49:44+5:302017-08-22T14:58:15+5:30
17 ऑगस्टच्या रात्री पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करणा-या करणा-या लष्करी जवानाच्या केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. पत्नीच्या शवविच्छेदन अहवालानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती ही माहिती समोर
जांजगीर , दि. 22 - 17 ऑगस्टच्या रात्री पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करणा-या करणा-या लष्करी जवानाच्या केसमध्ये नवा खुलासा झाला आहे. पत्नीच्या शवविच्छेदन अहवालानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती होती ही माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील जांजगीर येथील ही घटना आहे.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत जवान आकाश चंडेल (वय- 22) हा पत्नी निकिता गर्भवती असल्याचं वृत्त समजल्यापासून तणावात होता. त्याला निकिताच्या चारित्र्यावर शंका होती, त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता. घटना घडली त्या रात्री दोघांमध्ये या मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आकाशने टेलीफोनच्या वायरच्या सहाय्याने निकिताचा गळा आवळला. त्यानंतर आकाश घरातून कार घेऊन निघाला व रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये कार उभी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून सुसाट जात असलेल्या मालगाडीसमोर उडी घेऊन त्याने आत्महत्या केली.
या घटनेमुळे आकाशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून आकाश आणि निकिता असं काही करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये.
दारूच्या नशेत फिरत होता आकाश-
17 ऑगस्टच्या संध्याकाळी आकाश दारूच्या नशेत बाईकवरून फिरत होता असं गावक-यांनी सांगितलं. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच निकिता माहेराहून सासरी आली होती तर आकाश 10 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता.
आकाश आणि निकितामध्ये झालं होतं भांडण-
जवळच्या नातेवाईकांनुसार, दोन-तीन दिवसांपासून आकाश आणि निकितामध्ये कोणत्यातरी कारणावरून खटके उडत होते.
मिळाली सुसाइड नोट-
आकाशच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली. सुसाइड नोटमध्ये मी आणि माझी पत्नी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत आहोत. आधी मी निकिताचा गळा आवळेल आणि त्यानंतर मी ट्रेन खाली उडी घेऊन आत्महत्या करेल असं आमचं ठरलं आहे. यामध्ये आमच्या कुटुंबाचा काहीच दोष नसून त्यांना दोषी धरलं जाऊ नये.
सुसाइड नोटमध्ये आकाशची मजबुरी-
आकाशने पुढे लिहिलंय, मी सैन्यात आहे आणि वर्षभरात मी केवळ 2-3 महिनेच घरी येऊ शकतो , ही माझी मजबुरी आहे. बाबा मला माफ करा आणि भावाला कायमचं घरी बोलावून घ्या.