छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:28 AM2023-11-07T09:28:37+5:302023-11-07T09:29:02+5:30
मिझोराममध्ये देखील मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांना मतदान करता आले नाही.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. २० मतदारसंघांत हे मतदान होत आहे. पैकी १० मतदारसंघांत सकाळी सात ते दुपारी तीन आणि उर्वरीत मतदारसंघांत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान मतदान सुरु असताना सुकमामध्ये आयईडी बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. यामध्ये निवडणूक ड्युटीवर तैनात असलेला एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान नक्षलवादी हल्ला झाला. सुकमा येथे नक्षलग्रस्त भागात तोंडमर्काजवळ IED स्फोट झाला आहे. यामध्ये कोब्रा बटालियनचा जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती ठीक आहे.
मिझोराममध्ये देखील मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांना मतदान करता आले नाही. ते मतदान कक्षात गेले मात्र ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्यांना मतदान करता आलेले नाही. मिझोराममध्ये त्रिशंकू विधानसभा होणार नाही, तेथे MNF शासित विधानसभा असेल, केंद्रात आम्ही एनडीएसोबत आहोत, इथे भाजपसोबत नाही, असे त्यांनी सांगितले.