छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांचा हिंसाचार, सहा बॉम्बस्फोट, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 12:46 PM2018-11-11T12:46:38+5:302018-11-11T14:52:56+5:30
छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत.
रायपूर - छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटांमध्ये एका जवानाला वीरमरण आले. तसेच बीजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे, तर एकाला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे छडयंत्र नक्षलवाद्यांनी आखले असून, गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त बस्तर भागातून 300 हून अधिक आयईडी जप्त केले आहेत. ॉ
#UPDATE A set of 6 IEDs were planted in a series and were set off in one go between village Gome and Gattakal in Koyali beda #Chhattisgarhhttps://t.co/p8NvgTogDA
— ANI (@ANI) November 11, 2018
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीपथकावर पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी सहा स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात एएसआय महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. बीएसएफचे गस्तीपथक रविवारी सकाळी कोयलीबेडा परिसरात गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, या जखमी जवानाला वीरमरण आले.
दुसरीकडे बीजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका माओवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर एकाला जिवंत पकडले आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
Chhattisgarh: Encounter underway in Bijapur between security forces and Maoists. One Maoist dead, one apprehended. Arms and ammunition recovered. Operation continues
— ANI (@ANI) November 11, 2018