छत्तीसगडमध्ये महिला उमेदवारांचा टक्का कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:53 AM2018-11-10T05:53:26+5:302018-11-10T05:53:44+5:30
एरवी राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणाचे व त्यांना समान पातळीवर आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु छत्तीसगड विधानसभेत महिलांची संख्या वाढण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसत आहेत.
- योगेश पांडे
राजनांदगाव : एरवी राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणाचे व त्यांना समान पातळीवर आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु छत्तीसगड विधानसभेत महिलांची संख्या वाढण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसत आहेत. दक्षिण छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शर्यतीत केवळ ६ टक्के महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १२ नोव्हेंबरला आहे. छत्तीसगडमधील ९० पैकी जवळपास ३३ टक्के मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये महिलांची मते निर्णायक ठरू शकतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये राजनांदगाव, बस्तर, कोंडागाव, सुकमा, बीजापूर, कांकेर (उत्तर बस्तर) व दंतेवाडा (दक्षिण बस्तर) या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बस्तर, दंतेवाडा, कांकेर, राजनांदगाव या जिल्ह्यांत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा वरचढ आहे.
असे असूनही सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत हात आखडता घेतला आहे. १८ मतदारसंघांतील १९० उमेदवारांत महिलांची संख्या अवघी १३ इतकी आहे. एकूण उमेदवारांच्या तुलनेत महिलांची टक्केवारी ही फक्त ६.८४ टक्केच आहे.
प्रादेशिक पक्षांचेही दुर्लक्ष
दक्षिण छत्तीसगडमधील १८ जागांवर प्रादेशिक पक्ष व अपक्ष मिळून १२० हून अधिक उमेदवार निवडणूक लढत आहेत. मात्र प्रादेशिक पक्षांनीदेखील स्थानिक महिला नेतृत्व समोर यावे यासाठी पुढाकार घेतलेला नाही.
भाजपातर्फे सर्वाधिक चार, काँग्रेसकडून तीन महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. तीन
अपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहेत, तर इतर पक्षांतर्फे केवळ तीन महिलांनाच संधी देण्यात आली आहे.
२०१३ च्या तुलनेत दोनच अधिक
२०१३ च्या तुलनेत दोनच अधिक