दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 09:17 AM2024-10-19T09:17:29+5:302024-10-19T09:21:57+5:30

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन भावांचा रहस्यमय परिस्थितीत दोन भावांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील चार व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Chhattisgarh: The family was performing religious rituals with the dead bodies of the two children, the neighbors called the police, then... | दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...

दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन भावांचा रहस्यमय परिस्थितीत दोन भावांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील चार व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे. हे कुटुंब मागच्या काही दिवसांपासून धार्मिक विधी करत होतं, अशी माहिती  पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बराद्वारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तंदुलडीह गावामध्ये घडली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, सदर कुटुंबीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांना मंत्रोच्चाराचे आवाज आले, तेव्हा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचे तेव्हा त्यांना तिथे विकास गोंड (२५) आणि विक्की गोंड (२२) हे बेशुद्धावस्थेत सापडले. तर त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती त्यांच्याभोवती बसून धार्मिक विधी करत होते. त्यांच्यासमोर एक फोटो ठेवलेला होता. तो उज्जैनमधील कुठल्या तरी महाराजाचा होता. पोलीस दोन्ही भावांना त्वरित रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर त्यांची आई पिरीत बाई (७०), बहिणी चंद्रिका आणि अमृका आणि एक भाऊ विशाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालानुसार मृत तरुणांच्या शरीरामध्ये कुठल्यातरी विषारी पदार्थाच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूचं अचूक कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.  

Web Title: Chhattisgarh: The family was performing religious rituals with the dead bodies of the two children, the neighbors called the police, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.