बाईकवरील नियंत्रण सुटल्यानं दोघे पडले; मागून येत होता मोठा ट्रक; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 17:53 IST2021-09-28T17:53:06+5:302021-09-28T17:53:29+5:30
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

बाईकवरील नियंत्रण सुटल्यानं दोघे पडले; मागून येत होता मोठा ट्रक; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
अंबिकापूर: छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकीवरीव दोघे खाली कोसळले. पुढच्या काही क्षणांत ट्रकचं चाक तरुणाच्या अंगावरून गेलं. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी ही घटना घडली. ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या बनारस चौकातून अवजड ट्रक गांधी चौकाच्या दिशेनं येत होता. एक तरुण, तरुणी दुचाकीवरून त्याच रस्त्यानं जात होते. ट्रक त्यांच्या दुचाकीच्या अगदी मागे होता. तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. तो दुचाकीसह खाली कोसळला. मागे असलेली तरुणीदेखील खाली पडली. पुढच्या काही क्षणात अवजड ट्रक तिच्या शरीरावरून गेला.
प्रचंड मोठा ट्रक शरीरावरून गेल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. स्थानिकांनी तरुणीचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. तरुणीच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर स्थानिक नरमले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात पाठवला.