छत्तीसगढचे प्रधान सचिव अटकेत
By admin | Published: February 22, 2017 03:57 AM2017-02-22T03:57:27+5:302017-02-22T03:57:27+5:30
छत्तीसगढचे वरिष्ठ आयएएस अधिकारी बी.एल. अग्रवाल यांना सीबीआयने अटक केल्याने खळबळ उडाली
नवी दिल्ली : छत्तीसगढचे वरिष्ठ आयएएस अधिकारी बी.एल. अग्रवाल यांना सीबीआयने अटक केल्याने खळबळ उडाली. त्यांच्या विरुद्ध सुरू असलेली चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे प्रधान सचिव अग्रवाल यांना रायपूर येथील त्यांचे नातेवाईक आनंद अग्रवाल व एक दलाल भगवानसिंहसह अटक केलेली आहे. त्यानंतर दलालाची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो सोने व ३९ लाख रुपये रोख सापडले. १९९८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अग्रवाल हे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी दाबण्याच प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २०१० मध्ये दाखल केलेल्या दोन प्रकरणांत त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)