बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन दोषी
By admin | Published: April 24, 2017 04:42 PM2017-04-24T16:42:33+5:302017-04-24T16:48:57+5:30
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह आणखी तिघांना बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरविले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह आणखी तिघांना बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरविले आहे.
गेल्यावर्षी 8 जूनला सीबीआयने छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनविणे, असा आरोप केला. तसेच, 1998-99 च्या दरम्यान बंगळुरुमध्ये छोटा राजन याने मोहन कुमार या नावाने बनावट पासपोर्ट दाखल केला होता. यावेळी रहाटे, शहा आणि लक्ष्मणन यांनी त्याकडे डोळेझाक केल्याचे सीबीआयने आपल्या आरोपत्रात म्हटले आहे. या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या विशेष न्यायालयाने छोटा राजनसह या तिघांनाही दोषी ठरविले.
छोटा राजन याच्यावर भारतात दहशतवादी कृत्य, खून, अपहरण, तस्करी अशाप्रकारचे 85 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये इंडोनेशियाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचे इंडोनेशियातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. सध्या तो सीबीआयच्या ताब्यात आहे.
#FLASH: Chhota Rajan and three others convicted in a fake passport case, by a Delhi court. Arguments on sentence to be heard tomorrow pic.twitter.com/ydVv1cTK7z
— ANI (@ANI_news) April 24, 2017