चार्टर्ड प्लेनने उद्या छोटा राजन भारतात
By admin | Published: November 4, 2015 07:11 PM2015-11-04T19:11:54+5:302015-11-04T19:11:54+5:30
कुख्यात डॉन छोटा राजनला उद्या चार्टर्ड प्लेनने इंडोनेशियातून भारतात आणले जाणार आहे. दिल्लीत झालेल्या गृहमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
बाली (इंडोनेशिया), दि. ४ - कुख्यात डॉन छोटा राजनला उद्या चार्टर्ड प्लेनने इंडोनेशियातून भारतात आणले जाणार आहे.
दिल्लीत झालेल्या गृहमंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभल आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियातील कमर्शिअल विमानांचं उड्डाण बंद आहे. इंडोनेशियातून रवाना होणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे राजनला अखेर चार्टर्ड प्लेनने भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
छोटा राजनला २५ ऑक्टोबरला बाली बेटावर अटक करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातून इंडोनेशियाला येताच विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मुंबईत जन्मलेला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे कधीकाळी दाऊदचा निकटवर्तीय होता. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोघे वेगळे झाले. राजनवर मुंबईत हत्या, तस्करी, खंडणी, ड्रग्ज तस्करी यासारखे ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. २० वर्षापासून सुरक्षा यंत्रणांनेला चकमा देणाऱ्या राजनला इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे अटक करण्यात आली आहे.